राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुनावणी आज संपली असून त्यावर उद्या म्हणजे बुधवारी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. आज दिवसभर सुमारे चार तास या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. आता यावर उद्या शिंदे गटाच्या वतीनं युक्तीवाद करण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस या सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहेत. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे.
#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SupremeCourt #BJP #SharadPawar #AnilDeshmukh #ChandrashekharBawankule #NCP #SatyajeetTambe #BalasahebThorat #Congress #NavneetRana #RaviRana #ValentinesDay #Maharashtra